Home स्टोरी हि नोटंकी आता थांबवा! आमदार वैभव नाईक

हि नोटंकी आता थांबवा! आमदार वैभव नाईक

2136

दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग व्यवसाय सुरू होत नाहीत. याला जबाबदार भाजपच आहे. राज्यात व केंद्रात तुमचे मंत्री आहेत. मग तुमचे हे डबल इंजिनचे सरकार असताना ही एमआयडीसी सुरू होत नाही. हे तुमचे अपयश जनतेला कळेल यासाठी जनतेने व गावातील सरपंचाने जे आंदोलन पुकारले आहे त्याला तुम्ही पाठिंबा देऊन तुमचे अपयश झाकण्यासाठी तुम्ही नौटंकी करत आहात. ही नोटंकी आता थांबवा कुडाळ येथे एमआयडीसी मध्ये नवीन नवीन उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. मग अडाळीमध्येच मध्येच वेगळं चित्र का?  याला जबाबदार तुम्हीच आहात. अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केली. श्री नाईक पुढे म्हणाले खरंतर आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग व्यवसाय येत नाहीत याला जबाबदार हेच आहेत. आता कोणीतरी खो घालतोय म्हणून जी ओरड हे करत आहेत हे दोघांमधीलच भांडणे आहेत. दोघे आपोआप सतत भांडण करत असून जनतेची दिशाभूल करत आहेत. दहा वर्ष या एमआयडीसी मंजूर होऊन झाली. असे तुम्ही म्हणत आहात. मग या दहा वर्षात तुमचे सरकार सत्तेत आहे. मग तुम्हाला आतापर्यंत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास एवढा वेळ का लागला?  याचे आत्मचिंतन करा आणि नंतर नौटंकी करा. एमआयडीसी मध्ये उद्योग व्यवसाय ना प्लॉट दिले जात नाहीत. म्हणून त्या भागातील सरपंच व ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यानंतर तुमचे हे अपयश जनतेसमोर येईल म्हणून तुम्ही आता या आंदोलना पाठिंबा दर्शवून एक प्रकारे तुमची ही जनतेसमोर नौटंकी आहे  असे ते म्हणाले.