Home शिक्षण हिमांशू चव्हाणला बिडीएस परीक्षेत सिल्वर मेडल!

हिमांशू चव्हाणला बिडीएस परीक्षेत सिल्वर मेडल!

68

देवगड प्रतिनिधी: देवगड जामसंडे येथील मुकुंद वासुदेव फाटक प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता दुसरीतील विध्यार्थी हिमांशु नारायण चव्हाण याने बिडीएस या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत ९१ गुण मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

तसेच इंडियन टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेमध्ये १७८ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त तर मंथन या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत ११६ गुण मिळवून पडेल केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष एड. अजित गोगटे, कार्यवाह प्रवीण जोग, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका मराठे मॅडम, जोग मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.