Home सनातन हिंदू राष्ट्र जागृती सभेचे ११ जानेवारीला तुळसुलीत आयोजन.

हिंदू राष्ट्र जागृती सभेचे ११ जानेवारीला तुळसुलीत आयोजन.

45

कुडाळ: हिंदू जनजागृती समिती व  समस्त धर्मप्रेमी हिंदूंच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभा कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालयाच्या सभागृहात शनिवार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या सभेमध्ये हिंदू समाजासमोर उभ्या असलेल्या विविध आव्हानांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून, हिंदू संस्कृतीचे संरक्षण, राष्ट्रधर्म, सामाजिक एकता व जागृती या विषयांवर प्रबोधन केले जाणार आहे. सभेत हिंदुत्ववादी विचारवंत व वक्ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आजच्या काळात हिंदू समाजाने संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य करणे आवश्यक असून, या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. तुळसुली गावाच्या पंचक्रोशीत अनेक ठिकाणी कोपरासभा घेऊन सभेला येण्यासाठी निमंत्रण देण्यात येत आहे. नागरीकांचा ऊत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सभेस कुडाळ तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी, युवकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.