सावंतवाडी प्रतिनिधी: सन्माननीय माजी शिक्षण मंत्री तथा आमदार मा. दिपक भाई केसरकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले इलेक्शन जळवं आल्यावर काही लोक रस्त्यावर घडणाऱ्या लहान लहान गोष्टी खूप काही मोठ्या असल्यासारख्या करून दाखवतात. याचा अर्थ अपघातात मृत्यू झालेल्या घटना या लहान लहान असतात असं त्यांच मत आहे की काय? असा प्रश्न समाजसेवक रवी जाधव यांनी उपस्थित केला आहे.
रवी जाधव पुढे म्हणाले कि, एक लक्षात ठेवा तुमच्यासाठी कोणीतरी अपघातात मृत्यू होणेसारख्या गोष्टी लहान लहान असतील परंतु ज्याच्या घरात हा प्रसंग घडला त्याच्यासाठी ते दुःख पचवणं फार मोठी गोष्ट आहे. आपण नेहमी विमानाने प्रवास करतात. त्यामुळे शहरातील रस्ते चांगले आहेत की वाईट आहेत हे तुम्हाला कसं समजणार? कोणाच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता कधीतरी सावंतवाडी शहरातील व आजूबाजूच्या गावातील रस्त्यावरून एकदा तरी फेरफटका मारावा. मग आपल्या लक्षात येईल.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था आहे जी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडणाऱ्या अपघाताप्रसंगी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावते म्हणून त्यांच्या वेदना या संस्थेला समजतात त्यामुळे स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे आमच्या संस्थेच्या माध्यमातून बुजवतो. जे काम येथील प्रशासन तसेच नेत्यांनी करायला पाहिजे ते काम आमची संस्था करते परंतु आमचं दुर्दैव या कामाला येथील आमदारांकडून राजकारण असं म्हटलं जातं तरी याला आम्ही तुम्ही दिलेली शब्बासकी समजतो परंतु आपल्याला सांगू इच्छितो आमची ही सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेचा इलेक्शन किंवा राजकारणाशी काडी मात्राचा संबंध नाही परंतु या संस्थेतील सदस्यांबद्दल आताचे सळसळत्या रक्ताचे युवा नेते विचार न करता बोलतात. त्या युवा नेत्यांना एवढंच सांगावस वाटतं कि जनतेचे अनेक प्रश्न -अनेक समस्या आहेत. पुढे हे सर्व प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हालाच सोडवायचे आहेत. त्यासाठी बॅनर वरून जरा खाली उतरा आणि आमच्या “सोबत जीवनरक्षण अभियान” अंतर्गत ३० सप्टेंबरला राबवण्यात येणाऱ्या अभियानामध्ये सामील व्हा. कारण उद्या तुम्ही या शहराचे नगरसेवक म्हणून आम्हा सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणार आहात. त्यासाठी थोडी सवय आतापासूनच तुम्हाला झाली पाहिजे.







