हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मराठवाडा, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अन्य काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटामुळे केळी, गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणमधील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात पाऊस होणार आहे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव याभागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
Home स्टोरी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस होण्याची...