आरोग्य शिबिराचा घेतला ६० जणानी लाभ
मसुरे प्रतिनिधी: हडी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम कौतुकास्पद असतात. विध्यार्थी गुणगौरव, जेष्ठ ग्रामस्थांच्या विविध स्पर्धा, आणि आरोग्य शिबीर असे विविधांगी उपक्रम यशस्वी पणे राबवून आम्हा तरुणांना अंतर्मुख करणारी मेहनत यामागे सर्व जेष्ठांची असते. गावचा प्रथम नागरिक म्हणून सर्वतोपरी मदत या संघास यापुढेही राहील असे प्रतिपादन हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी येथे केले.
फेसकॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून विवेकानंद नेत्रालय कणकवली व कोकण कला व शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने हडी येथे आयोजित नेत्र चिकित्सा व रक्त तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
नेत्र तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराचा ६०जणांनी लाभ घेतला. यामध्ये १० जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर अल्प खर्चात २० जणांना चष्मा देण्यात येणार आहे. शिबिराचा प्रारंभ हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी दीपप्रज्वलन करून केला. विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे संदीप कदम, पूजा चव्हाण, कुणाल चव्हाण, नितीन कदम यांनी सहकार्य केले. यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष मोहन घाडीगावकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, सदस्य गुरुनाथ गावकर, सौ प्रज्ञा तोंडवळकर, सौ मानसी परब, सौ सुप्रिया वेंगुर्लेकर, सौ सुरेखा घाडीगावकर, सौ मनीषा वेंगुर्लेकर, रमेश कावले, प्रभाकर चिंदरकर, अभय गावकर, रामदास पेडणेकर, सदानंद शेडगे, आदि उपस्थित होते. प्रास्ताविक करताना चंद्रकांत पाटकर यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले यांनी मानले.