Home स्टोरी हडपीड स्वामी समर्थ मठ येथे पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात

94

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे आज मंगळवारी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणातसाजरा करण्यात आला. सकाळी पादुका पूजन, होमहवन, नामस्मरण, सकाळी ११ वाजता पालखी सोहळा,महाआरती, महाप्रसाद,सायं ३:०० वाजता नामस्मरण सप्ताहाची सांगता, सायं ५:०० वा सुस्वर भक्तीगीतांचा कार्यक्रम, रात्रौ ८:०० वा.कलांकुर ग्रुप मालवण निर्मित मराठ मोळा नजराणा आदी कार्यक्रम झाले.स्वामी मूर्ती ला तुळशी पानांची आरास करण्यात आली होती.

अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषणश्री. नंदकुमार पेडणेकर, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईसंचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) – गाव समिती (हडपीड देवगड) सदस्य उपस्थित होते.