Home स्टोरी हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे ६ मे रोजी स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम!

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे ६ मे रोजी स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम!

73

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स. ७:०० ते १०:०० पादुका पूजन, होमहवन, स. १०:३० ते १२:०० नामस्मरण, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ४:०० श्री स्वामी कृपा तारकमंत्र, दुपारी ४:०० ते ६:०० शिरगाव वारकरी सांप्रदाय यांचा विठूनामाचा हरिपाठ, सायं ६:०० ते ८:०० कलाप्रेमी कराओके सिंगीग क्लब देवगड यांचा अभंगवाणी अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) व गाव समिती (हडपीड देवगड) यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.