Home स्टोरी हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमा!

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमा!

199

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त ३ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे स्वामी मुर्तीवर अभिषेक, श्री ची पादुका पूजा, अभिषेक, श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने १ ते ३ जुलै या कालावधी आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीलामृत पोथी पारायण सांगता, नामस्मरण, महाआरती महाप्रसाद तसेच दुपारी देवगड तालुक्यातील दहावी परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी भवानी जंक्शन वारकरी भजन दिंडी दाभोळे राऊतवाडी यांचा दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ हडपीड मठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.