Home स्टोरी हडपीड मठातील स्वामी समर्थ मूर्तीवरील वज्रलेप पूर्णत्वास! २७ मार्च पासून मूर्ती दर्शन...

हडपीड मठातील स्वामी समर्थ मूर्तीवरील वज्रलेप पूर्णत्वास! २७ मार्च पासून मूर्ती दर्शन खुले

134

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठातील स्वामींच्या मुख्य मुर्तीवर वज्रलेप करण्याच्या कार्यामुळे १३ मार्चपासून मठातील मुख्य मुर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सदर वज्रलेप काम पूर्ण झाल्या नंतर २७ मार्चपासून विधिवत स्वामींची पुजा झाल्यानंतर मूर्ती दर्शन खुले करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व भक्तांना आपले श्रध्दास्थान असलेल्या स्वामी दर्शनापासून दूर रहावे लागले होते. भाविकानी सहकार्य केल्याबद्दल श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांच्या वतीने मठाचे संस्थापक सचिव व अक्कलकोट भूषण, स्वामीरत्न पुरस्कार सन्माननीत श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर,अध्यक्ष प्रभाकर राणे यांनी आभार मानले आहेत.