Home स्टोरी हडपिड स्वामी समर्थ मठात १७ ऑगस्टला स्वामी नामजप सोहळा!

हडपिड स्वामी समर्थ मठात १७ ऑगस्टला स्वामी नामजप सोहळा!

203

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड येथे गु १७ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवारचे औचित्य साधून प्रथमच एक दिवसीय श्री स्वामी समर्थ नामाचा जागर होणार आहे. गुरुवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ पर्यंत असा अखंड २४ तास नामजप होणार आहे.या एक दिवसीय नामजप कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा.असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे व अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त मठाचे सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.