Home राजकारण स्वा.सावरकर यात्रा निघू शकते मग छत्रपती शिवाजी महाराज सन्मान यात्रा का होऊ...

स्वा.सावरकर यात्रा निघू शकते मग छत्रपती शिवाजी महाराज सन्मान यात्रा का होऊ शकत नाही ?-श्री.योगेश धुरी.

179

सिंधुदुर्ग: स्वा.सावरकरांबद्दल कायम आदरच आहे,परंतु ज्याने हिंदूचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलून देखील भाजप सारखा पक्ष त्या व्यक्तीला स्वा सावरकर यात्रेत पहिल्या रांगेत बसवून मान देत असेल तर ही गोष्ट फार गंभीर आणि आमच्या सारख्या तरुण शिवभक्ताला न रुचणारी आहे,छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान यात्रा शिवप्रेमी व मराठा समाजाने काढावी. भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधाने केलीत परंतु आजपर्यंत एकही भाजपच्या नेत्याने एक चकार शब्द काढला नाही किंवा साधी दिलगीरी व्यक्त केली नाही ,ते का गप्प आहेत हे ईडी लाच माहीत काल परवा झालेल्या भाजप च्या स्वा सावरकर यात्रेत ज्या व्यक्तीने आमच्या दैवता वर आक्षेपार्ह बोलले त्याला पहिली खुर्ची देऊन गौरविले त्याचा आम्ही निषेध करतो, मतांसाठी भाजप महाराजांच नाव घेते हे यामुळे सिद्ध च झालंय. या माध्यमातून मी समस्त शिवभक्तांना,मराठा समाजाला आवाहन करतो की आपण एकत्र होऊन छत्रपती शिवाजी महाराज सन्मान यात्रा सिंधुदुर्ग मधून सुरू करावी, यासाठी लागेल ती मदत युवासेना करेल अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली आहे. यावेळी युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे,युवासेना चिटणीस तानाजी पालव,युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना कुडाळ शहर समन्वयक अमित राणे,युवासेनेचे राजू गवंडे उपस्थित होते