Home स्टोरी स्वामींच्या नामस्मरणात मोठी ताकद! अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांचे प्रतिपादन....

स्वामींच्या नामस्मरणात मोठी ताकद! अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांचे प्रतिपादन. संकल्प एक कोटी नामस्मरण जपाचा.

146

मसुरे प्रतिनिधी: स्वामी समर्थांचे भक्तीचे कार्य पुढे नेण्याचे काम नंदकुमार पेडणेकर यांच्यासारखे स्वामी भक्त करत आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!’ या उक्तीनुसार स्वामीनि नामस्मरण जप आपल्याकडून पूर्ण करून घेतला आहे. नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. पुढील जीवनात आपणा सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो. नवीन भक्त निवास दर्शन रांग तसेच श्रीकृष्ण मंदिर याच्या पायाभरणीमध्ये या लिखित जपाचा निश्चितच उपयोग होईल. स्वामीनामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम स्वामीभक्त नंदकुमार पेडणेकर करत आहेत. त्यांच्या या कार्याला माझ्या यापुढेही शुभेच्छा आणि आशीर्वाद राहतील असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी अक्कलकोट येथे केले. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड आणि श्री.दत्त स्वामी सेवा केंद्र स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर आरे काॅलनी गोरेगाव यांच्या वतीने एक कोटी नामाजपाचा संकल्प गुरुपौर्णिमेनिमित्त करण्यात आला होता. सदर नामजपच्या वह्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर तसेच वटवृक्ष मंदिर येथे सुपूर्द करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प केलेल्या ‘श्री स्वामी समर्थ ‘ या एक करोड नामजप संकल्प वह्या मोठ्या भक्तीपूर्वक वातावरणात अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ समाधी मठात सर्व स्वामी भक्तांंस आशीर्वाद मिळण्यासाठी ठेवण्यात आल्या. एक कोटी जपाची पुजा चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री.अन्नुमहाराज यांनी करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एक कोटी दिव्य जप वह्या पालखीतून श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथे वाजत गाजत मिरवणूकीतून नेण्यात आल्या.

वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष श्री.महेश इंगळे यांनी सर्व पालखी धारकांचा सत्कार करत स्वामी कृपाप्रसाद वस्त्र दिले. यावेळी अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार सन्मानित हडपिड मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर, श्री.दत्त स्वामी सेवा केंद्र स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर आरे काॅलनी गोरेगाव मठाचे मठाधीश स्वामी भक्त श्री.अशोक गुराम यांची मोलाची साथ लाभली.

सर्व स्वामी भक्तांनी भाग घेऊन आपली स्वामी भक्तीची सेवा रूजू केल्या बद्दल नंदकुमार पेडणेकर यांनी आभार मानले. यावेळी श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड संस्थापक सचिव श्री.नंदकुमार पेडणेकर, श्री.स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर गोरेगाव आरे वसाहत मुंबईचे  श्री.अशोक गुराम, श्री.नितीन सदानंद म्हापसेकर,श्री.सचिन राघो लोके,श्री.अनंत जंगम, श्री.मारूती जंगम,श्री.प्रकाश जोईल,श्री.मधुसूदन भडसाळे, श्री राणे आदी असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो : अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थान कार्यालयात हडपीड मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर, अशोक गुराम या ना सन्मानित करताना देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे व अन्य स्वामी भक्त

छाया :