Home स्टोरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप उफाडे यांना “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार” जाहीर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप उफाडे यांना “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार” जाहीर

56

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांना संजीवनी फाउंडेशन संगमनेर यांच्यामार्फत दरवर्षी शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष, शेतकरी चळवळीतील युवा नेतृत्व संदीप उपाडे यांना जाहीर झाला आहे. १ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील नामवंत मान्यवरांच्या हस्ते संदीप उफाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संदीप उफाडे हे अनेक वर्ष शेतकरी चळवळीमध्ये सातत्याने काम करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडून रस्त्यावरची लढाई लढण्यात ते अग्रभागी असतात. शेतकरी हिताच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह दिंडोरी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संदिप उफाडे यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शेतकरी चळवळीचा सन्मान आहे.शेतकरी संघटनेत घरावर तुळशीपत्र ठेवूनच काम करावे लागते.ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या माणसांसाठी आपण काही केलं पाहिजे या स्वच्छ हेतूने आज संदीप आमच्या सोबत काम करत आहे.अतिशय कष्टाळु व प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान बघून आम्हा सर्वांना आनंद झालाय.

-संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना