Home स्पोर्ट स्वातंत्र्यदिना निम्मिताने सिंधू रनर्सचा सावंतवाडी १२ तास रन अनोखा उपक्रम.

स्वातंत्र्यदिना निम्मिताने सिंधू रनर्सचा सावंतवाडी १२ तास रन अनोखा उपक्रम.

163

सावंतवाडी प्रतिनिधी: देशात आणि जगभरात भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सिंधू रनर्स टीम कडून सावंतवाडी १२ तास रनच्या रूपाने अनोखी मानवंदना देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्यातील होतकरू आणि क्रीडा प्रेमी तरुणांना स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंकडून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःचे व्यासपीठ मिळावे म्हणून सिंधू रनर्सटीम ने सावंतवाडी येथे ३ तास / ६ तास / १२ तास आणि १२ तास रिले रनची संकल्पना राबवली. सिंधुदुर्ग जिल्यात एवढीमोढी रन आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. या वर्षी नृसिंह अवतार हि संकल्पना घेऊन सावंतवाडी कला प्रकार गंजिफा देशात आणि जगात पोचवण्यासाठी टीम ने प्रयत्न केले. सिंधू रनर्स चे टीम मेंबर्स ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, प्रसाद कोरगांवकर, भूषण बान्देलकर, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन चे डायरेक्टर रोहन मोरे आणि इतर टीम जवळपास २ ते ३ महिने हा इव्हेंट नीट पार पडावा म्हणून लागणाऱ्या परवानग्या घेणे, टी-शर्ट, सन्मानचिंन्ह, हैड्रेशन सपोर्ट अश्या बऱ्याच गोष्टीची जुळवाजुळव करत होते. बाहेर गावाहून येणाऱ्या आपल्या रनरमित्रांची नीट व्यवस्था आणि योग्य पाहुणचार व्हावा यासाठी सिंधू रनर टीमने विशेष खबरदारी घेतली.

या रन मध्ये जिल्यातील आणि जिल्ह्याबाहेरील (गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथून) तब्बल 80 धावकांनी सहभाग नोंदविला. या अभिनव उपक्रमाला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा महत्वपूर्ण पाठिंबा लाभला. हि रन १५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ८ वाजता सावंतवाडीच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या राजवाडा येथून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि डॉ शंतनू तेंडुलकर, सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो अँड टॅक्सी संघटना अध्यक्ष श्री सुधीर पराडकर यांची आणि इतर मान्यवारांच्या उपस्थित १५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ८ वाजता सुरु झाली. राजवाड्यातून सुरवात होऊन पुढे सावंतवाडी मोती तलावाला १.६ किलोमीटर अंतर धावकांना ३ तास / ६ तास / १२ तास आणि १२ तास रिले रन करायचे होते. किती किलोमीटर पाळायचे हे बंधन नव्हते पण धावकांनी त्यांनी निवडलेले रन टाईमिंग पूर्ण करणे बंधनकारक होते. सर्व रनर च्या एक मताने हैड्रेशन आणि फूड आयोजन केले होते (केळी, मोसंबी, उकडलेले हरभरे, खजूर, कोकण सरबत, पाणी आणि बरेच काही). रात्रभर रन असल्याने धावकांची खरी कसोटी झोपेच्या वेळेस पळणे हि होती. सिंधू रनर टीमच्या मदतीला जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम आणि फिसिओ सपोर्टला डॉ. शुक्ला फिजीओथेरपि क्लिनिक ची टीम पण होती. या टीमने वेळोवेळी रनर ला मेडिकल चेकअप आणि फिजीओथेरपि सपोर्ट देऊन पुढील रन करण्यास मोलाचा हातभार लावला.

सिंधुदुर्ग जिल्यातील काही नावाजलेल्या डॉक्टर्सनी रन मध्ये सहभाग नोंदविला व सिंधू रनर च्या आयोजनाबद्दल भरभरून शुभेच्या दिल्या. याच दरम्यान काही छोट्या धावकांनी पण ३ तासांची रन पूर्ण केली, सहज बुरड, मानस सावंत, सुशोभन सावंत, स्वराज सावंत, रिहाना सारंग, इशिता, मयुष, आर्य कापडी या छोट्या धावकांनी सगळ्या रनर ची मनेजिंकली. जशी वेळ संपत जात होती तशी धावकांची दमछाक पण होत होती पण जास्तीत जास्त किलोमीटर पूर्ण करणार या ध्येयाने झपाटलेले धावक सतत पळत होते. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता राजवाड्यात रनची सांगता करण्यात आली. रन पूर्ण झाल्यावर धावकांना फयसीओ थेरपी देण्यात आली आणि अल्पोपहार देण्यात आला. या इव्हेंटचा मनचिंन्ह प्रदान सोहळा राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे, अल्ट्रा रनर नितीन फेडते, आयर्न मॅन विनायक पाटील, अविनाश फडके, कोकण कोस्टल मॅरेथॉन डायरेक्टर प्रसाद देवस्थळी आणि महाराष्ट्र राज्य कब्बडीपटू विनायक पराडकर या मान्यवारांच्या उपस्थित पार पडला. प्रत्येक धवकाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवारांनी या अभिनव उपक्रमामुळे आपल्या जिल्ह्याला आणि देशाला जागतिक पातळीवर नेणारे धावक तयार होतील अशी अशा व्यक्त केली आणि सिंधू रनर टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

या रन मध्ये प्रत्येक रन प्रकारात विजेत्या व उपविजेत्या धवकाला विशेष संपाम चिन्ह देण्यात आले. सावंतवाडी १२ तासांच्या धावण्याचे निकाल खाली दिले आहेत.

१२ तास रन खुला गट : विजेता: रॉबर्ट वाझ. ४४ लूप ७२ किमी, उपविजेता : डॉ प्रशांत मडव ३७ लूप ६१.५ किमी

१२ तास संघ रिले: विजेता : विजेता : टीम सिंधू रनर (मेघराज, फ्रँकी, तेजस्वी, सर्वेश) ६० लूप ९८ किमी

उपविजेता : टीम वेंगा फिटनेस (इशिता, मयुष, मायरन, अजेंद्र) ५६ लूप ९१.५ किमी

६ तास रन पुरुष : विजेता: अश्विन गड २८ लूप ४६ किमी, उपविजेता : रवींद्र गावडे २६ लूप ४३ किमी

६ तास रन महिला : विजेती : शेरियन दूराडो २३ लूप ३८ किमी ५ तास ५३ मिनिटांत, उपविजेती : सुजाता रासकर : २३ लूप ३८ किमी ५ तास ५६ मिनिटांत

३ तास रन पुरुष : विजेता : जय पुलस्कर १५ लूप २४.५ किमी, उपविजेता : गौरेश जाधव १४ लूप २३ किमी

३ तास रन महिला : विजेता: आर्या कपाडी १३ लूप २१.५ किमी, उपविजेता: हिना आंबेरकर १२ लूप २० किमी

या उपक्रमात केलेल्या सकार्याबद्दल खालील नमूद केलेल्या व्यक्ती आणि संघटनांचे मी आभार मानतो.

१. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले

२. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन टीम (रोहन मोरे सर)

३. डॉ. शुक्ला फिजीओथेरपि क्लिनिक कुडाळ

४. श्री नातू सर (मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद)

५. अर्पण मेडिकल (रामा गावडे)

६. स्पोर्ट्स ७ T -शिर्ट्स

७. टीम Runbuddies (Bib ट्रॅकिंग सिस्टिम)

८. रवींद्र Decoration

९. नंदू गावडे (बॅनर / ऍडव्हर्टीसेमेन्ट)

धावणे या व्ययाम प्रकारा बद्दल जनसामान्यात जागृती करून आपल्या जिल्यात व राज्यात देशाचे नेतृत्व करणारे धावपटू तयार करणे हेच या मागचे उद्धिष्ट आहे. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ५वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन ४ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ४ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन, कोकण कोस्टल मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे. साऊथ आफ्रिका येथे झालेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन २०२४ मध्ये सिंधू रनर टीमच्या प्रसाद कोरगावकर आणि ओंकार पराडकर या दोन धावपटूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे आणि देशाचे नाव जगभरात पोचवले आहे.