Home स्टोरी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक आमच्या ताब्यात द्या! आनंद शिंदे….

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक आमच्या ताब्यात द्या! आनंद शिंदे….

133

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण डोंबीवली महानगर पालिकेने सन २०१० साली गोळीवली येथे निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाची आज जी दुरावस्था झाली आहे ती पाहून असे वाटते की महापालिकेने हे स्मारक बनवून आमच्या भावनांशी खेळ केला आहे, स्मारक बनवता येत नसेल तर ते आमच्या ताब्यात द्या ते आम्ही आमच्या खर्चातून सुसज्ज बनवतो अशी मागणी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे जेष्ठ पुत्र महागायक आनंद शिंदे यांनी जाहीर पणे केली आहे.

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या २३ जून या १९ व्या स्मृती दिना निमित्त सिध्दार्थ नगर कल्याण पूर्व येथे अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या समयी प्रसार माध्यमांशी बोलतांना महागायक आनंद शिंदे यांनी ही उदिग्ध प्रतिक्रीया दिली. आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या आमदार फंडातून माता रमाई चौकात खुल्या वृत्त पत्र वाचनालयाची निर्मिती केली आहे. या वृत्त पत्र वाचनालयात अन्य महापुरुषांबरोबरच कालकथीत प्रल्हाद शिंदे यांचेही त्रिमिती शिल्प लावण्यात आले आहे. या शिल्पाला आनंद शिंदे यांनी पुष्पहार घालुन आपल्या पित्याला अभिवादन केले.

या समयी आपल्या भावना व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, कोळीवली येथील स्मारकाची दुर्दशा पाहून असे वाटते की, महापालिकेने हे स्मारक बनवले नसते तरी बरे झाले असते, त्या स्मारकापेक्षा आमदार गणपत गायकवाड यांनी प्रल्हाद शिंदे यांचे जे शिल्प लावले आहे त्या शिल्पाजवळ निदान चार माणसे येवून तरी बसतात, या ठिकाणी स्वच्छता राखली जाते, शिल्पाचे पावित्रही जतन केले जात आहे त्या मुळे महापालिकेने बनवलेल्या स्मारका पेक्षा हे स्मारक नक्कीच पेरणादायी आहे, कल्याण डोंबीवली महापालिकेला कोळीवली येथील स्मारकाची सुसज्ज निर्मिती करता येत नसेल आणि आहे त्या स्मारकाचीही निगा राखता येत नसेल तर ते स्मारक आहे त्या स्थितीत आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने स्मारकाचे काम पूर्ण करू अशी कळकळीची विनंती या समयी आनंद शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केली. या समयी समाजसेवक सुबोध भारत, कुशाल निकाळे यांचे सह आनंद शिंदे यांचे सहकारी उपस्थित होते.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृती दिना निमित्त त्यांच्या रहात्या घरासमोर आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय कार्यक्रमात अनेक नवोदीत गायकांनी गिते सादर करून प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा देत स्व. प्रल्हाद शिंदे अभिवादन केले. दिवसभर चाललेल्या या अभिवादन कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून प्रल्हाद शिंदे यांचे निकटवर्तीय तसेच चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी महापौर रमेश जाधव यांचे स्व. प्रल्हाद शिंदे यांना अभिवादन!

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या कोळीवली येथील स्मारकातील प्रल्हाद शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले तसेच सिद्धार्थ नगर येथील प्रल्हाद शिंदे यांना अभिवाद करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही सहभाग घेऊन स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.