Home राजकारण स्वतःच्या आमदारकीसाठी सामंत बधुंच्या विरोधात भूमिका घेणारे केसरकर हे कोणाचेच होऊ शकणार...

स्वतःच्या आमदारकीसाठी सामंत बधुंच्या विरोधात भूमिका घेणारे केसरकर हे कोणाचेच होऊ शकणार नाहीत! योगेश धुरी 

183

राजकारणात निर्लज्ज पणाचा कळस असू शकतो हे केसरकरांनी दाखवून दिलं.

 वनसंज्ञा ही राणे महसुलमंत्री असतानाच जिल्ह्यात आली हे सत्य नाकारता येणार नाही. 

 कुडाळ प्रतिनिधी: केसरकरांनी राजकारणात निर्लज्ज पणाचा कळस असू शकतो हे केसरकरांनी दाखवून दिलं. केसरकर हे गेले काही वर्ष दहशदवाद च्या नावाने बोंबलत होते, आता त्याच दहशतवादाच्या बाजूला बसून त्यांचे गोडवे गातांना दिसत आहेत. राऊत साहेबांवर बोलण्याची केसरकरांची पात्रता आहे काय? केसकरांचे थोडेच दिवस राहिलेत. असा टोला  युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी लगावला आहे.

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी पुढे म्हणाले की, राणे महसूलमंत्री असतांना जिल्ह्यात ४२००० हजार हेक्टर वर वनसंज्ञा आली. हा अन्याय राणे असतानाच झाला. हे सत्य नाकारता येणार नाही. कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त माणगाव खोऱ्यात वनसंज्ञा आहे. केसरकर यांनी जिल्ह्यातील तरुणांच वाटोळं केल, केसरकरांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केला. डी. एड. बेरोजगारांना आता कळल असेल कि राणे केसरकरांनी त्यांना कश्या पद्धतीने फसवलं हे आता दोघांना एकत्र बघून कळल असेल. स्वतःची आमदारकी वाचवावी म्हणून केसरकर यांनी स्वतःच्या पक्षातील सामंत बंधूच्या विरोधात जाऊन राणे यांच्या पारड्यात मत टाकलं. अश्या रंगबदलू माणसाने राऊत साहेबांवर बोलू नये.