Home स्टोरी स्मारकाचे काम पुर्ण झाल्यानंतरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे कल्याण पूर्वेत होणार आगमन!

स्मारकाचे काम पुर्ण झाल्यानंतरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे कल्याण पूर्वेत होणार आगमन!

230

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- प्रदिर्घ कालखंडानंतर कल्याण पूर्वेत निर्माण होत असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाची निर्मिती प्रगतीपथावर असून या निर्माणाधिन स्मारकाची पहाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी रात्री केली . या पहाणी नंतर या स्मारकात अनावरण करावयाच्या डॉ . पूर्णाकृती पुतळाचे पूर्वनियोजित आगमन स्थगित करण्यात आले असून स्मारकाचे काम पूर्ण झाल्या नंतरच पुतळ्याचे आगमन होणार असल्याचे स्मारक समितीच्या वतीने कार्याध्यक्ष महेश गायकवाड यांनी जाहिर केले आहे. गेल्या वर्षी ११ एप्रिल २०२२ रोजी प्रभाग ड कार्यालयाच्या बाजुला असलेल्या राखिव भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक निर्मितीचा कार्यादेश कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आला. या कार्यादेशानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ एप्रिल २०२२ रोजी स्मारकाच्या भूमिपजनाचा भव्य समारंभ पार पडला. कार्यादेशानुसार स्मारकाचे काम माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु पहिल्या दोन महिन्यात कामात अनेक अडचणी उद्भवल्याने सद्या स्मारकाचे काम ५० टक्के इतकेच झाले आहे. अशा परिस्थितीतच येत्या १४ एप्रिल – आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तयार असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा १२ एप्रिल रोजी आणण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी स्मारकाची पहाणी केल्यानंतर स्मारकाचे काम पूर्ण झाल्या नंतरच पुतळा आणला जाईल असे नक्की करण्यात आले आहे.

स्मारकाच्या कामाची पाहणी करतांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

पहाणी दरम्यान स्मारकाची निर्मिती झाल्यानंतर १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर च्या अभिवादन कार्यक्रमासाठीही मोकळी जागा असावी असे नियोजन करावे. यासह अन्य काही आवश्यक ते बदल करण्याची सुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधीत ठेकेदाराला केल्या असून, हे स्मारक संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिकतेची जोड असलेले एक नंबरचे असेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या पहाणी दौर्‍या समयी सर्वश्री महेश गायकवाड, अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, सुमेध हुमणे, राहुल केदारे, भारत सोनवणे यांचे सह माधुरी काळे, प्रशांत काळे, निलेश शिंदे, मल्लेश शेट्टी, विशाल पावशे, राजाराम पावशे, उदय रसाळ, केतन रोकडे,मनोज बेळमकर, महादेव रामभोळे, देवानंद रामभोळे, अशोक भोसले, पराग मेंढ, धनविजयसर, सुबोध भारत, मिलिंद बेळमकर, सिंधुताई मेश्राम, ललिता आखाडे, सुवर्णाताई गायकवाड, छायाताई वाघमारे, पुष्पा ठाकरे आदी पदाधिकारी आणि आंबेडकरवादी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते .