Home शिक्षण कु. स्पृहा आरोंदेकर हिला युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS)...

कु. स्पृहा आरोंदेकर हिला युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन २०२५ परीक्षेत घवघवीत यश प्राप्त.

55

सावंतवाडी प्रतिनिधी: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन २०२५ परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी ‘ कु. स्पृहा अमेय आरोंदेकर ‘ हिने घवघवीत यश प्राप्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये ‘ कु. स्पृहा अमेय आरोंदेकर ‘ हिने सुवर्णपदक पटकावले. तसेच मान्यवरांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा बक्षीस वितरण सोहळा दिनांक २७ जुलै २०२५ रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे पार पडला. प्रशालेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील या विद्यार्थीनीचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.