सावंतवाडी प्रतिनिधी: येथील गरड मधील सौ लक्ष्मी शशिकांत राणे वय ७४ वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होत्या. त्या मनमिळावू शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या त्या सासू होत. तर मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष वटसावित्री मंडळाच्या पदाधिकारी सौ संजना परब यांच्या त्या मातोश्री होत.