सावंतवाडी प्रतिनिधी: नेहमी सर्वसामान्य गोरगरीब यांच्यासाठी धावून जाणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला असून आज २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. खरं तर ही परीक्षा माध्यमिक स्तरातील अत्यंत महत्त्वाची आणि पुढील जीवनाची दिशा ठरवणारी अशी मानली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बोर्डाचे केंद्र शाळेपासून आणि गावापासून दूर तालुकास्तरावर असते. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना बोर्डाच्या केंद्रापर्यंत परीक्षेत जाण्यासाठी प्रवास खर्च आणि खाजगी वाहन शोधावे लागते.यावर पर्याय म्हणून थेट शाळेकडून, घराकडून तालुकास्तरीय केंद्रावर विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात परीक्षा देता यावी. म्हणून त्यांची परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या येण्यासाठी वाहनाची व्यवस्था मोफत स्वरूपात करून दिली आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघातील दुर्गम व ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची व्यवस्था करून देऊन सौ. घारे परब यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. या त्यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा केंद्र पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय व दाणोली हायस्कूल वेंगुर्ले तालुक्यातील तुळस व मातोड हायस्कूल या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घर, शाळा येथून थेट परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याची व्यवस्था करून दिली आहे. आणि विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेच्या आजच्या पहिल्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांना बेस्ट लक केले. कुठलेही टेन्शन न घेता मुक्त वातावरणात आणि शांतपणे परीक्षेला सामोरे जा. यश तुमचेच आहे.. अशा स्वरूपात त्यांना मार्गदर्शनही केले आणि हाती गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा ही त्यांनी दिल्या कारिवडे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रामदास गवस संतोष राणे वासुदेव होडावडेकर व पालक सदाशिव हनपाडे यांनी दिल्या. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक देउ साईल तर शिक्षिका अर्चना सावंत, एकनाथ जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला परीक्षेला जात आहात, कुठलेही टेन्शन घेऊ नका. शांतपणे आणि तुम्ही जी वर्षभरात वर्गात उजळणी केली तेच परीक्षेला येणार आहे. त्यामुळे बिनधास्त रहा आणि परीक्षेला सामोरे जा. यशस्वी निश्चित व्हाल. अन घारे परब यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत केंद्रापर्यंत जाणवण्याची सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.