कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्पा विघ्नहर्ता गृह निर्माण सोसायटीच्या वाहन तळावर सोसायटीतील काही सदस्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीच्या तळ मजल्यवर असलेल्या वाहन तळावर करण्यात आलेल्या या अनधिकृत बांधकामामुळे तळ मजलावर रहाणाऱ्या एका कुटुंबाला या बांधकामुळे भविष्यात कायम स्वरूपी त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने या कुटूंबाने प्रभाग ९ आय कार्यालयासह कल्याण डोबिवलीच्या आमुक्तांकडेही या अनधिकृत बांधकामाची रितसर तक्रार केली आहे . परंतु या तक्रारीची दखल न घेता उलट पक्षी तक्रारदाराच्या व्यवसायावरच टाच आणण्यासाठी प्रभाग ९ आय कार्यालयाने तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याच्या उपजिवीकेचे साधन नष्ट करण्याचा घाट घातला आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे कल्याण पूर्वेत चर्चेला उधाण आले आहे. श्री मलंग रोड वरील अनमोल गार्डर समोर असलेल्या विघ्नहर्ता अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील रुम नं. ०० ४ मध्ये अशोक गायकवाड यांच्या सदनिकेला लागूनच सोसायटीने अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे गायकवाड कुटूंबियांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत असल्याने त्यांनी या अनधिकृत बांधकामाची लेखी तक्रार प्रभाग ९ आयच्या सहाय्यक आयुक्त सौ. हेमा मुंबरकर तसेच पालिका आयुक्तांना लेखी स्वरूपात दिली आहे. तरी सुध्दा शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवसात हे अनधिकृत बांधकाम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी अशोक गायकवाड हे सोमवारी दुपारी प्रभाग ९ आय कार्यालयात गेले व त्यांनी या प्रकाराची माहिती सहाय्यक आयुक्त सौ. हेमा मुंबरकर यांना दिली. परंतु या वेळी मुंबरकर यांनी अशोक गायकवाड यांच्याच हाती एक नोटीस देत सांगितले की तुमच्या दुकानाची सोसायटीने तक्रार दिली आहे त्याचे कागद पत्रे सादर करा. कागद पत्र सादर करण्यास गायकवाड यांना केवळ मात्र २४ तासांचीच मुदत देण्यात आली आहे. अशोक गायकवाड हे रहात असलेल्या इमारतीच्या जागेवर पूर्वी चाळ होती, त्या चाळीतील घरातच ते उपजिवीकेचे साधन म्हणून छोटेसे किराणा दुकान चालवत होते तेच किराणा दुकान इमारतीतील घरात कसल्याही प्रकारचे वाढीव बांधकाम न करता आजपर्यंत चालवत आले आहेत. या दुकानासाठी त्यांचे कडे रितसर परवाना सुद्धा आहे. परंतु अशोक गायकवाड यांनी आपल्या घरा समोरील वाहन तळाच्या जागेवर अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळेच सुडबुद्धी पोटी सोसायटीने त्यांच्या दुकानाची तक्रार केली आहे हे स्पष्ट होत आहे. गायकवाड यांचे कडे दुकानाचा आवश्यक तो परवाना असून आज पर्यंत या दुकाना विषयी सोसायटीने कसल्याही प्रकारे तक्रार केलेली नसतांना केवळ त्यांनी अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून त्यांच्या उपजिवीकेचे साधन असलेले दुकान उध्वस्त करण्याचा डाव आखला जात असल्याचे गायकवाड कुटूंबियांचे म्हणणे असून आमच्यावर होणार्या अन्याया विरोधात प्रसंगी न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे अशोक गायकवाड यांनी सांगितले आहे. या प्रकरणी मा सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत कसल्याही प्रकारची प्रतिक्रीया दिली नाही.