सावंतवाडी: कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम व्हॅन वार-: सोमवार, दिनांक २८ जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येथे कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सरची तपासणी कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मधील तज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत तपासणी होणार आहे.
खालील लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मधील तज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत तपासणी करून घ्यावी.
१) ३ आठवड्यापेक्षा अधिक तोंड किंवा जीभेवर घाव /३ आठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला
२) तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा आणे/तोंड उघडायला त्रास
३) स्तनांमध्ये गाठ / स्तनाच्या आकारात बदल
४) स्तनाग्रामधून (निप्पल) पू किंवा रक्तस्त्राव
५) मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव
६) मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होण
७) शारिरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे
८)योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.
कर्करोगाचे संकेत खालीलप्रमाणे आहेत..!
१) शरीरातील कोणत्याही अवयवामध्ये सुज येणे
२) तीळ, मस्सा यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे.
३) न भरणारी जखम
४) सतत ताप किंवा वजनात घट होणे.
५) ४ आठवड्यापेक्षा अधिक काळची अंगदुखी
तरी जास्तीत जास्त लोकांनी आपली उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे कर्करोगाविषयी तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग विभागावमार्फत करण्यात येत आहे.
