Home स्टोरी सैनिक परंपरा असलेला कलंबिस्त गावात बाहेरील व्यक्तींना जमीन न विकण्याचा एकजुटीने ठराव...

सैनिक परंपरा असलेला कलंबिस्त गावात बाहेरील व्यक्तींना जमीन न विकण्याचा एकजुटीने ठराव मंजूर.

50

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी ही सैनिक परंपरा असलेला भाग आहे. या सह्याद्री पट्ट्याच्या भागात गावातील जमिनी बाहेरील एजंटामार्फत खरेदी विक्री होत आहेत. गावातील जमिनी अशा परस्पर विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आणि मोठ्या संख्येने बाहेरील जमीन विक्री एजंट कार्यरत झाल्याने गावातील जमिनी पूर्वजांनी शाबू ठेवले आहेत. त्या तशात कायमस्वरूपी राखण्याच्या दृष्टीने आता देश सेवेवरून देशाची सेवा केलेले आणि आता गावात स्थायिक झालेले माजी सैनिक आता एकवटले आहेत त्यांनी गावातील जमिनी पूर्वजांनी ज्या राखून ठेवले आहेत. त्या यापुढेही राखून ठेवून आपल्या गावचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. गावातील जमिनी विक्री व्यवहार करू नये असा महत्त्वपूर्ण ठराव घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीत गावातील जमीन बाहेरील एजंटाला दिल्यास खपवून घेतले जाणार नाही. परराज्यातील टोळी या परिसरात जमीन खरेदी विक्री करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून कार्यरत झाली आहे. ते थोपवण्यासाठी आणि गावातील जमिनी बाहेरील व्यक्तींना विकू नये यासाठी आता माजी सैनिक संघटना पुढे सरसावली आहे. कलंबिस्त माजी सैनिक संघटनेच्या वार्षिक सभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

कलंबिस्त गाव हे नैसर्गिक दृष्ट्या संपन्न शांत व ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरांनी नटलेले आहे .आमच्या गावाला सैनिक परंपरा आहे. शेती हा आपल्या गावचा मुख्य आधारस्तंभ असून ग्रामस्थांचे जीवन पूर्णतः त्यावर अवलंबून आहे. मात्र अलीकडच्या काळात गावातील मोक्याच्या आणि बहुमूल्य जमिनी काही स्थानिक दलाल बाहेरील व्यक्तींना (परप्रांतीयांना )शेतकऱ्यांची फसवणूक करून कवडी मोलाने विकल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर ही सभा खालील बाबीवर ठाम निर्णय घेत आहे.  गावातील कोणीही आपली जमीन किंवा निवासी जागा परप्रांतीय व्यक्तींना विक्री करू नये. असे आवाहन सर्व ग्रामस्थांना करण्यात येत आहे. जर एखाद्या खातेदाराला काही कारणास्तव जमीन विकणे भाग पडले तर ती जमीन गावातील स्थानिक व्यक्तींना विकणे. गाव सर्वतोपरी बाहेरील व्यक्तींना जमीन विकून होणारा तात्पुरता आर्थिक फायदा हा भविष्यातील पिढ्यांसाठी नुकसानकारक ठरेल .त्यामुळे वरील प्रमाणे होणाऱ्या नुकसानामुळे जमिनी परप्रांतीयांना विक्रीची बंदी करण्याचा ठराव आजी माजी सैनिक संघटनेच्या बैठकीत सभेत मंजूर करण्यात आला. तसेच या ठरावाची प्रत ग्रामपंचायत कार्यालय कलंबिस्त यांना देऊन त्यांनी ग्रामसभेत असाच धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या संघटनेमार्फत करण्यात येत्या २६ जानेवारीला करण्यात येणार आहे. इतिहास २६ जानेवारीला. ग्रामसभा होणार आहे त्यामध्येही ग्रामपंचायतने तसा ठराव घेऊन गावातील जमिनी पुन्हा बाहेरील एजंटांन विक्री व्यवहार करू नये असा धोरणात्मक निर्णय घ्यावा. असे माजी सैनिक संघटनेने सुचित केले आहे. ठराव घेऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व तहसीलदार सावंतवाडी यांना पाठविण्यात यावा अशी विनंती सरपंच सपना सावंत यांना केली आहे. या बैठकीत कलंबिस्त गावचे आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ लक्ष्मण सावंत,अरुण तानाजी सावंत, अनंत शिवराम सावंत, विश्वजीत यशवंत सावंत सगुण अनंत पास्ते, सुरेश भिवा गावडे, प्रकाश गुणाजी सावंत, सखाराम विश्राम बिडवे, भगवान कृष्णा पास्ते, विलास कृष्णा पास्ते, धोंडी सोमा सावंत, सुभाष कुडाजी सावंत, संजय धनाजी सावंत, यशवंत विष्णू तावडे, अरुण तुकाराम पास्ते, जयश्री शंकर गावडे व इतर उपस्थित माजी सैनिक. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलंबिस्त हा गाव घरटी सैनिक परंपरा असलेला गाव आहे. गेल्या तन पिढ्याहून अधिक सैन्य दलात कार्यरत आहेत. देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या या माजी सैनिकांनी आपले पूर्ण तारुण्य वय देशाच्या रक्षणासाठी घालवले आणि आता सैनिकी परंपरेतून गावी आल्यानंतर गाव आपला विकासापासून दूर जात आहे. त्यामुळे गावाला पुन्हा एकदा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी व गावातील पूर्वजांनी आपल्या जमिनी राखल्या डोंगर तसेच शेती बागायती कायम ठेवले आहेत. त्यामुळे हीच खरी आपल्या गावची ठेव आहे. ही जर परप्रांतीय लोकांच्या घशात गेली तर आपला गाव पूर्णपणे उध्वस्त होईल त्यासाठी आता देश सेवेचे रक्षण करून आलेल्या या माजी सैनिकांनी गाव रक्षणासाठी आणि गावातील जमिनी राखण्यासाठी असा पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावातील जमिनी विक्री व्यवहार थांबवण्यासाठी माजी सैनिकांनी असे एक होऊन लढा देण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. माजी सैनिकांच्या या एकजुटीला आणि त्यांच्या संघटनेला खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य गावाने आदर्श घेण्यासारखा आहे.