Home शिक्षण सेवांगणच्या साने गुरुजी जीवनदर्शन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद! ४००० विद्यार्थी सहभागी.

सेवांगणच्या साने गुरुजी जीवनदर्शन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद! ४००० विद्यार्थी सहभागी.

53

मालवण प्रतिनिधी: साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण मालवणने साने गुरुजी जीवन दर्शन स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते त्याचा बक्षीस समारंभ मालवण व कट्टा येथे संपन्न झाला.

कट्टा येथील समारंभात दीपक भोगटे यानी मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल यानी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्या बद्दल आभार मानले. २ २ प्राथमिक शाळा २३ हायस्कूल मधील ४००० विद्यार्थी या परीक्षेस सहभागी झाले. सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. साने गुरुजींचे जीवन चारित्र्याची विदयार्थ्याना ओळख झाली. त्यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेचा सर्वांनी अंगिकार करावा असे आवाहन केले.

पार्वती कोदे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत साने गुरुजींची जीवनगाथा मुलाना सांगितली. गुरुनाथ ताम्हणकर यांनी या परीक्षेचा मुले पालक व शिक्षक याना खूप लाभ झाला असून त्यांच्या जीवनाविषयी पूर्ण माहिती मुलाना मिळाली या बद्दल सेवांगणला धन्यवाद दिले. पोखरण हायस्कूलचा विद्यार्थी विक्रांत सावंत याने आम्ही मित्रमंडळात चर्चा करून हे पुस्तक वाचले. पुस्तक छोटेखानी असल्याने वाचायला छान वाटले.  सेवांगणने अशाच प्रकारच्या स्पर्धा घ्याव्यात असं सूचवलं कार्यक्रमाच्या अध्यक्षा अदिती शृंगारे यांनी सेवांगणच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन मुलांचे अभिनंदन केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थाना शैक्षणिक भेटवस्तू प्रशस्ती पत्रक व सर्व सहभागी शाळाना अभिनंदन पत्र फ्रेम देण्यात आली. यावेळी कट्टा येथील कार्यक्रमास .अदिती शृंगारे, गुरुनाथ ताम्हणकर, बापू तळावडेकर, विकास म्हाडगुत, विणा म्हाडगुत, पार्वती कोदे, बेनके सर,महाभोज सर, विद्या चिंदरकर, बाळकृष्ण गोंधळी, जांभवडेकर मॅडम विद्यार्थी पालक उपस्थित होते.