Home स्टोरी सुरक्षा दलाची पुलवामामध्ये मोठी कारवाई! कमांडरसह एक दहशतवादी ठार

सुरक्षा दलाची पुलवामामध्ये मोठी कारवाई! कमांडरसह एक दहशतवादी ठार

114

२१ ऑगस्ट वार्ता: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश आले आहे. दि.२१ ऑगस्ट दिवशी सकाळी पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर असल्याचे ही वृत्त हाती येत आहे. याच बरोबर परिसरात सुरक्षा दलातर्फे शोधमोहीम सुरू आहे. पुलवामाच्या लारो-परिगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला हे यश मिळाले आहे.

 

दि.७ ऑगस्ट दिवशी सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यावेळी सुरक्षा दलांनी हिजबुलच्या एका टॉप कमांडरचा खात्माही केला होता.कमांडरच्या मृतदेहा मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या अंगरक्षकाचा मृतदेह मिळू शकलेला नाही आहे.

 

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला होता. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दि. ५ ऑगस्ट दिवशी ही कारवाई सुरू केली होती.