Home राजकारण सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद तर अजित पवारांना..” NCPचा फॉर्म्युला ठरला!

सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद तर अजित पवारांना..” NCPचा फॉर्म्युला ठरला!

116

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल यासंदर्भात सुरु असलेल्या चर्चांवर लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त झाल्यानंतर सुरुवातीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा होती. मुंबईत सध्या वाय.बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार सुप्रिया सुळे केंद्रीय अध्यक्ष असतील आणि अजित पवारांकडे राज्यातील राजकीय निर्णयाची जबाबदारी असेल, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे २००६ पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. सुप्रिया सुळे २००६ राज्यसभेच्या खासदार बनल्या होत्या. त्यानंतर त्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत्या. शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील राजकीय निर्णय अजित पवार घेतील, असा तोडगा निघाल्याची माहिती आहे.