Home स्टोरी सुदानमधुन आतार्यंत २,१०० भारतीय नागरिक मायदेशी

सुदानमधुन आतार्यंत २,१०० भारतीय नागरिक मायदेशी

79

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सुदानमध्ये गेल्या १५ दिवसांपासून लष्करी आणि निमलष्करी दलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळं सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून सुदानमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ राबवण्यात येत आहे. सूदानची राजधानी खार्तुमसह बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला हिंसाचार सुदानमधील स्थिती अस्थिर बनवत आहे. भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचे काम सध्या सुरु आहे. याचदरम्यान २३१ नागरिकांना सुखरुप परत घेऊन भारतीय वायुसेनाचे विमान नवी दिल्लीत पोहचले. यासंदर्भातली माहिती परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी ट्विट करत दिली आहे.

भारतीय वायुदलाने २७ आणि २८ एप्रिल रोजी ऑपरेशन कावेरी अंतर्गत वायुसेनेच्या c-120J या विमानाने एका छोट्या हवाईपट्टीत विमान लँड करत १२१ भारतीय नागरिकांचे प्राण वाचवले. वायुसेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या १२१ लोकांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश होता. तसेच गुरुवारी २० एप्रिल रोजी १३५ भारतीय नागरिकांना घेऊन वायुसेनेचे IAF C-130J विमान परतले. तसेच १६०० भारतीय सुखरुप मायदेशी परतत्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी ट्विट करत दिली.