मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ संलग्न सुकळवाड गावराई समाज संघाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचा गुणगौरव कार्यक्रम ९ जुलै रोजी दुपारी ३ वा. होणार आहे. तरी पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ आणि सुकळवाड व गावराई भंडारी समाज संघामार्फत करण्यात आले आहे.