१४ मे वार्ता: सीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जैस्वाल यांच्या जागी आयपीएस प्रवीण सूद यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस प्रवीण सूद २५ मे रोजी सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारतील. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सीबीआय प्रमुखासाठी तीन नावांची निवड केली होती. त्यापैकी आयपीएस प्रवीण सूद यांच्या नावाला मान्यता देण्यात आली असून त्यांची सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.