Home स्टोरी सीताराम गावडे यांचा युवा पत्रकारांकडून स्नेहसत्कार ..!

सीताराम गावडे यांचा युवा पत्रकारांकडून स्नेहसत्कार ..!

145

सावंतवाडी: सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे झुंजार नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व सीताराम गावडे यांचा येथील युवा पत्रकार बांधवांनी आज स्नेह सत्कार केला.

सिताराम गावडे यांची सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड झाली आहे. यानिमित्त त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहेत.

आज सावंतवाडी येथे युवा पत्रकार बांधवांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र शासन राज्य आदर्श युवा पुरस्कार प्राप्त प्राध्यापक तथा स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, आदर्श युवा पत्रकार विनायक गांवस, प्रसन्ना गोंदावळे, साबाजी परब यांसह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

यावेळी कोणत्याही समाजाच्या बांधवावर अन्याय झाल्यास आपण अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवण्यास योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन लढवय्या नेते सीताराम गावडे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रसन्ना गोंदावळे यांनी मानले.