Home स्टोरी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हरसिटी लवले पुणे येथे, ८ नोव्हेंबर ते १० दरम्यान विविध...

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हरसिटी लवले पुणे येथे, ८ नोव्हेंबर ते १० दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

90

पुणे: कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा संकल्पित, ९ व्या क्रिडा कला महोत्सवाचे (KPL-9) यजमान पद या वर्षी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण संस्था ,पुणे यांस लाभले असून  सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हरसिटी लवले पुणे येथे, ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ अशा तीन दिवसात हा महोत्सव संपन्न होणार आहे.

८ नोव्हेंबर रोजी जमलेल्या पाहुण्यांसाठी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असून, क्रीडा स्पर्धेचे उदघाटन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:०० वाजता, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मा. श्री उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते होणार आहे.

 

कुडाळ देशकर गौड ब्राह्मण समाज, पुणे संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण खानोलकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कला क्रीडा महोत्सवात, महिला पुरुष अशा दोन्ही गटांच्या day night क्रिकेट स्पर्धा बॅडमिंटन, बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा, तसेच ज्ञातीबंधवांनी साकारलेल्या विविध कलाकृतींचे कलादालन साकारणार असल्याची माहिती पुणे संस्थेचे सचिव श्री योगेश सामंत आणि पुणे KPL समिती प्रमुख श्री राजू नेरुरकर ह्यानी दिली.

 

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा विविध राज्यातून पुणे KPL 9 मध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व खेळाडू, विविध संस्थेचे पदाधिकारी , आणि कार्यकर्ते अशा सर्वांच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था पुणे संस्था करणार असून, सर्व क्रिडा व कला प्रेमी रसिकांनी मोठय़ा संख्येने या ज्ञातीबांधवांच्या मेळाव्यात आवर्जून उपस्थिती लावावी असे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण संस्था पुणे कडून आवाहन करण्यात आले आहे.

Pune KPL 9 रजिस्ट्रेशन लिंक देत आहोत https://kdgbindia.in/