Home स्टोरी सिनेमा टॉकीज जवळील आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! सुदैवाने जीवित हानी टळली….

सिनेमा टॉकीज जवळील आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! सुदैवाने जीवित हानी टळली….

200

सावंतवाडी प्रतिनिधी: दिनांक २१ जुलै रोजी संध्याकाळी भटवाडी साडेपाचच्या दरम्यान सिनेमा टॉकीज जवळील एक मोठा आंब्याचे झाड मुळासकट तुटून रस्त्यावर कोसळले. सुदैवाने जीवित हानी टळली. यासाठी सामाजिक बांधलकीच्या आपत्कालीन टीमने व नगरपरिषदेचे अधिकारी दीपक मापसेकर, वर चढून झाड तोडणारा पालिकेचा कर्मचारी आंबेडकर, इतर कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी रस्त्यावरचे झाड काही वेळेतच तोडून रहदारीस मार्ग मोकळा करून दिला.

ट्राफिक मोठ्या प्रमाणे वाढलं होतं याकरिता ट्राफिक पोलीस राजाराम राणे यांनी काय दखल घेऊन रहदारी सुरळीत केली. याकरिता सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, शाम हळदणकर, दीपक सावंत, सुजय सावंत सतीश बागवे, सुरेश सुरेश भोगटे, रवी जाधव यांनी यासाठी हातभार लावला.