सिंधुदुर्ग: १ मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिना निमित्त सिंधू रनर टीम ने गोवा ते सावंतवाडी इंटरसिटी १०० किलोमीटर ची अल्ट्रा रन आयोजित करण्यात आली होती. या अल्ट्रा रनची सुरवात ३० एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री देवी नवदुर्गा मंदिरातुन (बोरी फोन्डा गोवा) इथून साऊथ गोवा चे विधानसभा उमेदवार संकेत नाईक मुळे यांच्या हस्ते करण्यात आली, पुढे फोन्डा, मंगेशी, पणजी अट्टल सेतू, पर्वोरीम, धारगळ, तम्बोसा, बांदा मार्गे सावंतवाडी असे १०० किलोमीटर अंतर पार करून १६ धावक सावंतवाडी राजवाडा येथे १ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पोचले. या रन मध्ये सिंधुदुर्गातील १० तर इतर भागातून ८ धावत सहभागी झाले होते.
१. ओंकार पराडकर
२. प्रसाद कोरगावकर
३. डॉ स्नेहल गोवेकर
४. भूषण बान्देलकर
५. भूषण पराडकर
६. विनायक पाटील (कोल्हापूर)
७. सुनील जडेजा (गोवा)
८. टीमोथी रॉड्रीकस (गोवा)
९. नर्सम्हा नागवेकर (गोवा)
१०. सगुण गावडे (गोवा)
११. मिकील माशेलकर (गोवा)
१२. महेश शेटकर
१३. शर्वरी खेर (मुंबई)
१४. अनुपकुमार चौधरी (पुणे)
१५. निखिल तेंडुलकर
१६. ऍड संग्राम गावडे
१७. प्रज्योत राणे
१८. नम्रता कोकरे
मे महिन्यात खूप जास्ती तापमान (३५ ते ४० डिग्री) आणि जास्ती हवेतील आद्रता (८० ते ९० %) एवढ्या प्रतिकूल परिस्थिती १०० किलोमीटर धावणे म्हणजे दिव्यच आहे. तरी देखील या १८ धवकानी तब्बल १६ तासात हे अंतर पार केले. रात्रीची वेळ, जबरदस्त तापमान, दिवसभर तापलेले रस्ते आणि त्यामुळे पायांना बसणारे चटके तरी देखील जिद्धीने सर्व धावक १०० किलोमीटर धावले. या अश्या रन मध्ये महत्वाचा भाग असतो तो हैड्रेशन आणि मेडिकल सपोर्ट चा, धावकांना वेळोवेळी पाणी, खाणे आणि वैदकीय दुविधा पुरवणे हे खूप महत्वाचे ठरते. या रन ला धावकां सोबत मदतीला दत्तप्रसाद कळंगुटकर, उमेश नेवाळकर, कारण पांचाळ, संकेत नाईक, सुरज शिंगटे इत्यादी सपोर्टर्स होते. अतिशय सुंदर सपोर्ट या सर्वानी धावकांना दिला आणि म्हणूनच सर्व धावक अगदी वेळेत, कसलीही दुखापत न होता सावंतवाडीला पोचले.
या रनचा समारोप आणि बक्षीस प्रदान सोहळा सावंतवाडी राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लाखांराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर, कृषी अधिकारी मिलिंद निकम आणि जेष्ठ समाजसेवक आणि रिक्षा संघटना माजी अध्यक्ष सुधीर पराडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रन ला मदत करणाऱ्या सर्वांची सिंधू रनर टीम आभारी आहे. मयूर Construction केरवडे कुडाळ, मयूर टी शिर्ट्स कट्टा (मालवण), सौ अन्नपूर्णा कोरगावकर (ऍम्ब्युलन्स सपोर्ट), डॉ वि सी काठाने, डॉ. बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी), डॉ शंतनू तेंडुलकर, पंकज घोगळे (जाहिरात आणि मीडिया पार्टनर अँड सपोर्ट), रामा गावडे (अर्पण मेडिकल मेडिकल किट सपोर्ट), पोलीस निरीक्षक सावंतवाडी आणि बांदा पोलीस स्टेशन.
वरील उपक्रमाबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, दैनिक कोकण साद, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल, सर्व पत्रकार बंधू, डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्या सावंतवाडी), पखवाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्रहि शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावकतयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले.
सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.