Home स्टोरी सिंधू रनर टीम धावली शिरोडा (गोवा) ते सावंतवाडी १०० किलोमीटर इंटरसिटी रन

सिंधू रनर टीम धावली शिरोडा (गोवा) ते सावंतवाडी १०० किलोमीटर इंटरसिटी रन

89

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: १ मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिना निमित्त सिंधू रनर टीम ने गोवा ते सावंतवाडी इंटरसिटी १०० किलोमीटर ची अल्ट्रा रन आयोजित करण्यात आली होती. या अल्ट्रा रनची सुरवात ३० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री देवी नवदुर्गा मंदिरातुन (बोरी फोन्डा गोवा) इथून साऊथ गोवा चे विधानसभा उमेदवार संकेत नाईक मुळे आणि स्वप्नील बोरकर यांच्या हस्ते करण्यात आली, पुढे फोन्डा, मंगेशी, पणजी अट्टल सेतू, पर्वोरीम, धारगळ, तम्बोसा, बांदा मार्गे सावंतवाडी असे १०० किलोमीटर अंतर पार करून १२ धावक सावंतवाडी राजवाडा येथे १ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता पोचले.

या रन मध्ये सिंधुदुर्गातील ८ तर इतर भागातून ५ धावत सहभागी झाले होते. १. ओंकार पराडकर, २. डॉ स्नेहल गोवेकर, ३. भूषण बान्देलकर, ४.अद्वैत प्रभुदेसाई, ५.मेघराज कोकरे, ६. फ्रँकी गोम्स, ७. विनायक पाटील (कोल्हापूर), ८. प्रसाद बांदेकर, ९. महेश शेटकर, १०. अनिल वर्मा (मुंबई), ११. नेव्हिल पटेल (गुजरात), १२. सुनील ठाकूर (पुणे),

मे महिन्यात खूप जास्ती तापमान (३५ ते ४० डिग्री) आणि जास्ती हवेतील आद्रता (८० ते ९० %) एवढ्या प्रतिकूल परिस्थिती १०० किलोमीटर धावणे म्हणजे दिव्यच आहे. तरी देखील या १३ धवकानी तब्बल १६ तास आणि ३० मिनिटात हे अंतर पार केले. रात्रीची वेळ, जबरदस्त तापमान, दिवसभर तापलेले रस्ते आणि त्यामुळे पायांना बसणारे चटके तरी देखील जिद्धीने सर्व धावक १०० किलोमीटर धावले.या अश्या रन मध्ये महत्वाचा भाग असतो तो हैड्रेशन आणि मेडिकल सपोर्ट चा, धावकांना वेळोवेळी पाणी, खाणे आणि वैदकीय दुविधा पुरवणे हे खूप महत्वाचे ठरते. या रन ला धावकां सोबत मदतीला निखिल सरंबळकर, उमेश नेवाळकर, हर्षल सूर्यवंशी आणि दर्शन राणे इत्यादी सपोर्टर्स होते. अतिशय सुंदर सपोर्ट या सर्वानी धावकांना दिला आणि म्हणूनच सर्व धावक अगदी वेळेत, कसलीही दुखापत न होता सावंतवाडीला पोचले.

बक्षीस प्रदान सोहळा सावंतवाडी राजवाडा येथे संपन्न

या रनचा समारोप आणि बक्षीस प्रदान सोहळा सावंतवाडी राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लाखांराजे भोसले, प्राध्यापक सुभाष गोवेकर सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी लेख अधिकारी आणि उत्तम कब्बडी खेळाडू विनायक पराडकर आणि जेष्ठ समाजसेवक आणि रिक्षा संघटना माजी अध्यक्ष सुधीर पराडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी संघटित होऊन उत्तम खेळाडू घडविणायचे आवाहन मान्यवरांनी केले, तसेच मदतीची तयारी पण दाखवली. या रन ला मदत करणाऱ्या सर्वांची सिंधू रनर टीम आभारी आहे. रणजित राणे सर (अध्यक्ष सिंधुदुर्ग ऍथलेटे अससोसिएशन), सौ अन्नपूर्णा कोरगावकर (ऍम्ब्युलन्स सपोर्ट) डॉ. बाबासाहेब पाटील (प्राचार्य आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी), डॉ शंतनू तेंडुलकर, राजाराम लोंढे (जाहिरात आणि मीडिया पार्टनर अँड सपोर्ट), रामा गावडे (अर्पण मेडिकल मेडिकल किट सपोर्ट), पोलीस निरीक्षक सावंतवाडी फुलचंद मेंगडे, विवेक बान्देलकर, आकार प्रिंट्स कुडाळ, शिल्पा खोत (युवती सेने प्रमुख मालवण), सिंधुदुर्गात नवनवीन धावकतयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले.

सिंधू रनर टीम

सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन – २ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन – २ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन – २ वेळेस, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन – २ वेळेस, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन – २ वेळेस, जम्पिंग गोरिला ट्रेल रन – २ वेळेस, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.