सिंधुदुर्ग: महाराष्ट्र आणि गोवा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कोकण प्रांत मध्ये होणाऱ्या पहिल्या कोकण कोस्टल हाल्फ मॅरेथॉन (रत्नागिरी) मध्ये दहा खेळाडू सहभागी झाले होते. प्रसाद कोरगावकर, बाळकृष्ण सप्रे आणि विभावरी सप्रे हे या मॅरेथॉनचे राजदूत होते तर ओंकार पराडकर यांनी Pacer (वेळ बद्ध धावक) म्हणून सन्मानित करण्यात आले.
२०२४ वर्षाच्या सुरवातीला होतअसलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाल्फ मॅरेथॉन (रत्नागिरी) मध्ये सिंधू रनर टीम ने उत्तम वेळ नोंदवली. प्रसाद कोरगावकरने १ तास २५ मिनिटात, देवबा देसाईने १ तास ३७ मिनिटात, बाळकृष्ण सप्रेयांनी १ तास ५७ मिनिटात, ओंकार पराडकरने २ तास ९ मिनिटात, अजित पाटील यांनी २ तास 15 मिनिटात तर विभावरी सप्रे हिने २ तास ३० मिनिटात २१ किलोमीटर अंतर पार केले. रत्नागिरी मधल्या चड उतारअसणाऱ्या रस्त्यावरून हि रन भाटे समुद्र किनारी सांगता झाली. देश विदेशातून तब्बल १५०० धावक सहभागी झाले होते. कोकणात अशी मॅरेथॉन आयोजित केल्याबद्दल सर्वानी सुवर्ण सूर्य फौंडेशन (प्रसाद देवस्थळी) आणि संपूर्ण मॅरेथॉन आयोजन टीम चे आभार मानले.
मुंबईमध्ये झालेल्या ज्युपिटर ठाणे हाल्फ मॅरेथॉन मध्ये सिंधू रनर टीमच्या पाच धावांनी सहभाग नोंदवला. यामध्ये नरेश मांडवकर याने 1 तास 34 मिनिटात, महादेव बान्देलकर याने 1 तास ५४ मिनिटात, राघवेंद्र कुलकर्णी याने 1 तास 54 मिनिटात २१ किलोमीटर्स आणि जागृती बान्देलकर हिने १ तास १५ मिनिटात १० किलोमीटर अंतर पार केले.
वेंगुर्ला तुळस येथे अश्वमेध क्रीडा महोत्सव मध्ये ११ किलोमीटर रन मध्ये सिंधू रनर टीमच्या सहा धावपटूंनी सहभाग नोंदवला फ्रँकी गोम्स याने मुलांमध्ये प्रथम क्रमांक तसेच रसिका परब हिने मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. मेघराज कोकरे, नम्रता कोकरे, निखिल तेंडुलकर आणि सोनाली पाटील यांनीही ११ किलोमीटर अंतर पार केले करून टीमचे नाव उंचावले.
गोवा येथे झालेल्या आय रन मॅरेथॉन मध्ये ऋषिकेश लवाटे आणि विनायक पाटील या धवकानी सहभाग नोंदवला. या दोघांनीही उत्तम वेळेत २१ किलोमीटर अँड १० किलोमीटर अंतर पार केले. या घवघवीत कामगिरी बद्दल सिंधू रनर टीम वर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
अथक र्प्रयत्न करून सिंधू रनर टीमला नामवंत इंटरनॅशनल धावकांच्या यादीत आपले नाव करता आले याचा सिंधू रानर्स टीमला अभिमान आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्याने हे यश संपादन केले. या पुढे त्याला योग्य मार्गदर्शक मिळवून, उत्तम ट्रैनिंग देऊन देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल या साठी सिंधू रनर्स टीम प्रयत्नशील राहील.
सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन २ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.