शिवछत्रपतींचा पुतळा बसला असता मात्र खाजगी जमीन मालक जागा द्यायला तयार नाहीत!
सिंधुनगरी प्रतिनिधी:
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्या मधील जागा खाजगी व्यक्तींची आहे. जमीन देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे शिवछत्रपतींचा पुतळा होऊ शकत नाही! मात्र नौसेना दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत व नौसेना दिनाचा हा कार्यक्रम दिमागदार होणारच आहे! म्हणूनच या कार्यक्रमात कोणतेही राजकारण नको. असे मत पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यासाठी निवेदन घेऊन आलेल्या एका शिष्टमंडळासमोर व्यक्त केले.
सिंधुनगरी येथील कौशल्य विकास केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मालवण मधील एका शिष्टमंडळाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा बसवा असे आगरी मागणी निवेदनाद्वारे केली होती. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खुलासा करत सर्वांसमोर आपले भाषण करत नौसेना दिनाची भूमिका त्याचे महत्त्व व यामध्ये होत असलेले राजकारण आपल्या मतामधून व्यक्त केले.
नौसेना दिनाच्या कार्यक्रम यशस्वी व्हावा तो दिमागदार व्हावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्यासह पर्यायी जागेची पडताळणी ही सुरू आहे. नौसेना अधिकाऱ्यांच्या सोबत अनेक बैठका झाल्या आहेत. सर्जेकोट येथील किल्ला तसेच तारकर्ली ही पर्यायी ठिकाणी असून या जागांची पडताळणी सुरू आहे. सर्जेकोट किल्लामधील जागा सरकारी मालकीची असून तेथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यास अडचण येणार नाही. मात्र सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागाही खाजगी जमीन मालकांची आहे. पूर्णिमा सावंत यांनी जागा ज्या ठिकाणी देऊ केली होती ती सोयीची जागा नव्हती. तटबंदीला लागून जागा असल्यामुळे तेथे छत्रपतींचा पुतळा उभारला जाऊ शकत नाही यावेळी व्यक्त केली. या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी जी जागा निश्चित होईल त्या ठिकाणी येणारे सर्व रस्ते व सोयी सुविधा प्राधान्यक्रमाने निर्माण केल्या जातील. नागरिकांची कोणती गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. मात्र यामध्ये कोणते राजकारण नको असा विनंतीपूर्वक आदेशही त्यांनी यावेळी दिला.