Home स्पोर्ट सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तर्फे भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन….!

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तर्फे भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन….!

162

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमन असोशिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यंदा आपला २० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये पुरूष (खुला गट) – २१ किमी, मुले (वय १४ ते १७ गट) – ११ किमी, मुले (१४ वर्षाखालील गट)- मोती तलावास तीन फे-या, मुली (खुला गट) – ११ किमी, मुली (१४ वर्षाखालील गट)- मोती तलावास तीन फे-या, मुले मुली (१० वर्षाखालील गट)- मोती तलावास एक फेरी, जेष्ठ नागरीक (५० वर्षावरील)- मोती तलावास दोन फे-या अशा प्रकारे सहभागी होऊ शकतील.

 

मॅरेथॉन स्पर्धेची जग्गन्नाथराव भोसले उदयान येथून पहाटे ०६.०० वाजता सुरूवात होईल. मॅरेथॉन स्पर्धा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमन असोशिएशनचे दिवंगत अध्यक्ष पी.एफ. डॉटस यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात येत आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपली नोंदणी ९४२०१९५५१८/७८२२९४२०८१ या कमांकावर करावी. जिल्हयातील होतकरू धावपटूंनी या स्पर्धेत वहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सचिव श्री. सुनिल राऊळ यांनी केले आहे.