Home स्पोर्ट सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड...

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद…!

331

सावंतवाडी: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला.सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली आणि नगर परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.राज्य भरातून चारशे स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरवात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून करण्यात आली.प्रारंभी राष्ट्रगीत गायन करण्यात आले.सैनिक स्कूल कॅडेट अनुराग बागडी याने शहिद जवानांवर कविता सादर केली.यानंतर महाराष्ट्र गीतगायन करण्यात आले.खड्या आवाजात देण्यात आलेल्या शिवगर्जनेने स्पर्धकांमध्ये जोश संचारला.सदर स्पर्धा सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत पी.एफ. डाॅन्टस यांच्या पुण्य स्मृतींस समर्पित करण्यात आली.५८, एन.सी.सी.बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिपक द्याल,सुभेदार मेजर दिनेश गेडाम,सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कवठेकर,व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट,कॅथलिक पतसंस्था चेअरमन आनमारी डिसोजा,जाॅय डाॅन्टस , क्रिडाशिक्षक शैलेश नाईक,डाॅ.मिलिंद खानोलकर, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ,सुधीर नाईक,गजानन परब,पाचार्य एन.डी.गावडे ,प्रल्हाद तावडे,स्कूल स्टाफ,सैनिक पतसंस्था स्टाफ उपस्थित होते.

स्पर्धा १०,१४,१७ वयोगटातील मुले, मुली, खुला वयोगट मुले, मुली व जेष्ठ नागरिक अशा विविध वयोगटात घेण्यात आली. विविध वयोगटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली.

 

बक्षिस वितरण ब्रिगेडियर सुधीर सावंत, युवराज लखमराजे भोसले,सैनिक स्कूलचे सेक्रेटरी सुनील राऊळ, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार मेजर उमेश आदर,सैनिक वसतिगृह अधिक्षक श्री. मिसाळ यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली. स्पर्धेस सावंतवाडी नगरपरिषद, सैनिक वसतिगृह यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन ह्रषिकेश गावडे यानी केले.

१० वर्षा खालील वयोगटात प्रथम कु.जय पांडुरंग महोनगेकर, द्वितीय ओम मोहन शिरोडकर, तृतीय मायरा स्टीफन डिसोजा.

१४ वर्षा खालील मुले वयोगटात प्रथम कु. स्वराज तानाजी पाटील, द्वितीय अथर्व इराप्पा चिगारी, तृतीय आर्यन लक्ष्मण अहेर.

१० वर्षा खालील मुली वयोगटात प्रथम कु.ऋतुजा राजू जडे, द्वितीय कु.भक्ती अमित धुमक,तृतीय कु.श्रेया राजेश झोके.

१४ ते १७ वर्षा खालील वयोगटात प्रथम कु.सिद्धनाथ सत्यवान जगताप,द्वितीय ऋत्विक रामकुमारवर्मा,तृतीय सुमित बंडू पाटील

खुला वयोगट महिला प्रथम शिल्पा शंकर केंबळे,द्वितीय सुजाता उमेश मुंडेकर,तृतीय वेदांती बलराम मनगुतकर

खुला वयोगट पुरुष प्रथम वैभव सूर्यकांत नार्वेकर, द्वितीय कौस्तुभ डी. सावंत, तृतीय हरि ओम सिंग.

जेष्ठ नागरिक वयोगट प्रथम मेघ:शाम लक्ष्मण राणे, द्वितीय कल्लाप्पा तिरवीर, तृतीय नरसिंह दत्तात्रय कांबळे विजेते ठरले.