Home स्पोर्ट सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेत वरद इलेव्हन सिंधुदुर्ग विजेता…! सिंधुदुर्ग फ्रेंड्स सर्कल गृपचे आयोजन.

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेत वरद इलेव्हन सिंधुदुर्ग विजेता…! सिंधुदुर्ग फ्रेंड्स सर्कल गृपचे आयोजन.

173

मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग फ्रेंड्स सर्कल गृप आयोजीत मुंबई नेरळ मधली नावाजलेल्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेत  उद्योजक विनायक अपराज यांच्या वरद इलेव्हन सिंधुदुर्ग टीमने रेजिंग स्टार मालवण या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.  तृतीय क्रमांक ओंकार इलेव्हन घोणसरी आणि चतुर्थ क्रमांक मालवणी बॉईज मालवणी यांनी पटकावला. तृतीय व चतुर्थ क्रमांक चषक प्रणित दुखंडे यांनी पुरस्कृत केले होते. मालिकाविर दाजी नाईक याला दिनेश दुखंडे पुरस्कृत सायकल देण्यात आली.

 

या स्पर्धेचे आयोजन मुंबईतील तरुण होतकरू खेळाडू एकत्र येऊन गेली ५ वर्ष ही मुंबई SPL स्पर्धा भरवत करतात. चेतन  रासम, अनिल मातेफोड , वसंत परब, दीपक रासम, अमित धुरी, स्वप्नील तेली, महेश चव्हाण, संदीप गाडे आदी सह आम.नीतेश राणे  आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले. तसेच  या सर्व आयोजक टीमला  विनायक अपराज ,  तुकाराम रासम, दीपक परब, अभिजित रासम, अमित दुखंडे, वैशाली राणे, श्रुती उरणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन वैभव गावडे, समालोचन राजा सामंत , आबा कोचरेकर, सिद्धेश काष्टे, सुरेश कांदळगावकर यांनी केले. गुणलेखन तानाजी रासम आणि मंगेश राणे यांनी केले. उदघाटन नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केले. बक्षीस समारंभ विभाग प्रमुख नेरुळचे तानाजी जाधव, डॉ अमित दुखंडे,  तुकाराम रासम, वैशाली राणे पालव , दीपक परब, तुकाराम ओटवकर, विनायक अपराज, प्रणित दुखंडे , दिनेश दुखंडे आदी उपस्थित होते.