Home स्टोरी सिंधुदुर्ग पोलीसांच्या वतीने एम. आय. डी. सी. कुडाळ येथील महिला/ पुरुष कामगारांकरीता...

सिंधुदुर्ग पोलीसांच्या वतीने एम. आय. डी. सी. कुडाळ येथील महिला/ पुरुष कामगारांकरीता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.

65

कुडाळ: महाराष्ट्र शासनाच्या १ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व मा. श्री कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फतीने ग्रानफिशरीज प्रा.लि. एम. आय. डी. सी. कुडाळ येथील महिला/ पुरुष कामगार करीता जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये फॅक्टरी मॅनेजर श्री साधु अडागळे, असीस्टंट श्री प्रदिप बरगे आयोजक श्री आग्नेल फर्नाडीस कोऑडीनेटर असोसीएशन एमआयडीसी कुडाळ यांचे उपस्थितीमध्ये सपोनि श्रीमती हिरेमठ, मपोहेकॉ १५१ खोपकर, मपोहेकॉ ९७७ सावंत यांनी उपस्थित महिलाना नविन कायदा, पोलीस हेल्पलाईन नं डायल ११२, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार बाबत मार्गदर्शन केले तसेच महिला कामगार यांना बडीकॉप या पोलीस कम्युनिटी मार्फत चालणाऱ्या विशेष मोहिमेची माहिती पुरविण्यात आली. सदर कार्यक्रमास महिला व पुरुष असे एकूण ४५ कर्मचारी वर्ग उपस्थित होते.