सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग दशभूज मंडळ पुणे येथे कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी एकत्र आले आहेत. या मंडळाच्या वतीने लवकरच भव्य भवन उभारण्यात येणार आहे. २६ जानेवारीला रोजी वर्धापन दिन ताटात साजरा करण्यात आला.
पुणे शहरातील येरवडा, धानोरी, लोहगाव, टिंगरे नगर इत्यादी परिसरामध्ये राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावातील रहिवासी कामानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या सर्व सभासदांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत खुर्ची, रांगोळी, हळदी कुंकू, दहावी, बारावी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी बक्षीस समारंभ, तसेच ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ पाठ कुडाळ सिंधुदुर्ग शाखा भांडुप मुंबई यांचे ब्रह्मानंद चंद्रमुखी हे दशावतारी नाटक सादर करण्यात आले.
माननीय श्री.आमदार बापूसाहेब पठारे ,फ्लाईंग बर्ड स्कूलचे पुणे संस्थापक -अध्यक्ष मा. श्री.जयंत परांजपे सर, सौ रेखाताई चंद्रकांत टिंगरे, मा. नगरसेविका आणि नगरसेवक ,पुणे मनपा श्री .चंद्रकांत दादा टिंगरे, सौ शितल अजय सावंत मा. नगरसेविका, पुणे मनपा , श्री .अविनाश शिंदे, सौ कविता बिर्जे, पोलीस अधिकारी,तसेच मंडळाचे संस्थापक- मार्गदर्शन मा. श्री.सागर माळकर , संतोष माळकर, श्री प्रमोद सावंत,बाळकृष्ण राऊळ, मंडळाचे अध्यक्ष, सुनील परब सेक्रेटरी, राजू परब कार्याध्यक्ष, सतीश गावडे खजिनदार, आणि मंडळाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. त्याप्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मंडळाच्या वास्तूसाठी प्रयत्न करण्याच्या आश्वासन दिले .तसेच श्री. जयंत परांजपे सर यांनी मंडळाच्या इमारत साठी रोख 35 हजार देऊन सहकार्य केले .तसेच मंडळाचे मार्गदर्शक माननीय सागर माळकर यांनी सभासदांना मंडळाच्या वास्तू सिंधुदुर्ग भवनसाठी प्रयत्नf करण्याचे आवाहन केले. तसेच सभासदांना इमारत निधीसाठी संघटित राहून मंडळ व जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळातील सर्व सभासद वh मान्यवरांचे मंडळाचे कार्याध्यक्ष राजू परब सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.