Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य परंपरा मोठी आहे…! श्री विकास सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य परंपरा मोठी आहे…! श्री विकास सावंत

295

सावंतवाडी प्रतिनिधी: साहित्य मध्ये परिवर्तन होत आहे. साहित्यिक जे लिहितो आहे ते लिहितात त्याचा अर्थ कळणारे वाचक तयार व्हायला हवेत. आज मोबाईल स्टाईल वाचकांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत साहित्यिकांनी आपला धर्म सोडू नये. कुठलेही बंधन लादून घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीने जगताना आपल्या जगण्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हाती देऊ नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य परंपरा मोठी आहे. कवी केशवसुत त कविवर्य डॉक्टर वसंत सावंत या साहित्यिकांचा वारसा जोपासण्याचे काम आणि साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे नेण्याचे कार्य कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची नवीन पिढी करत आहे. हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. अशा शब्दात राणी पार्वती देवी हायस्कूल च्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांनी स्पष्ट केले.

राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात कोमसाप शाखा सावंतवाडीतर्फे यंदा पासून स्व.प्रा. मिलिंद भोसले व कै. अँड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी सागर साळुंके, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बार असोसएशनचे माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट दिलीप नार्वेकर, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, साहित्यिक लेखिका उषा परब, पुरस्कार प्राप्त विजेते निवेदक संजय कात्रे व साहित्यिक नाटककार सतीश पाटणकर, स्वर्गीय एडवोकेट दीपक नेवगी यांच्या सौभाग्यवती श्रीमती दिपाली नेवगी, स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले यांचे सुपुत्र निरज भोसले व भाऊ अनिल भोसले,पत्रकार अमोल टेंबकर, इतिहासकार प्राध्यापक जी. ए. बुवा, जिल्हा खजिनदार भरत गावडे, सेवानिवृत्त शिक्षक विजय प्रकाश आकेरकर, आधी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी स्व.प्रा ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार निवेदक, आदर्श शिक्षक प्रा. संजय कात्रे . तर कै.ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन मुख्याधिकारी सागर साळुंखे व विकास सावंत यांच्या हस्तेमान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली.