Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात तरुणाई भजनात दंग.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात तरुणाई भजनात दंग.

489

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणात आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात वाड्यावाड्यात भजनांचे मेळ भरले जातात. वैष्णवांचा हा मेळा म्हणजे जणू गणरायाला नमन होय. आज जमाना बदलला असे म्हटले गेले जाते. पण मोबाईलच्या जमान्यातही आजची तरुणाई भजनामध्ये दमून जात आहे. सह्याद्री पट्ट्यातील सैनिकांची परंपरा असलेल्या कलंबिस्त शिरसिंगे, वेर्ले, आंबोली, चौकुळ, सांगेली आणि देवसु या गावात आज तरुणांचे मेळ नव्या धरतीवर गाण्यांची चाल धरत आहेत.

गणेश चतुर्थी कालावधीत गेले आठ दिवस दिवस रात्र भावअंतरीचे हळवे, नमन माझे रे या गणरायाला, अवघे गरजे पंढरपुर अशा अनेक अभंग गीताने संपूर्ण भाग भक्तिमय रसात तरुणाई धुंद झाली आहे. मुंबई पुणेकर चाकरमनी आणि गाववासीय एकोप्याने भजन करत आहेत.