Home राजकारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्का..!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्का..!

53

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात एका मागून एक खिंडार पडत चालली आहे. तालुकाप्रमुख मायकल डिसोजा व उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता निरवडे येथील उपतालुकाप्रमुख संदीप पांढरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील एका पाठोपाठ एक पदाधिकारी राजीनामा देत आहेत. त्यामुळे पक्षात आता मोठी खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे हे राजीनामा सत्र पक्षश्रेष्ठी कसे रोखणार? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.