Home शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या शुक्रवार दि.२१ जुलै रोजी पावसाची सुट्टी जाहीर!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या शुक्रवार दि.२१ जुलै रोजी पावसाची सुट्टी जाहीर!

117

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काढला आदेश!

सिंधुदुर्ग:-पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना उद्या शुक्रवार दि.२१ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काढले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी पाणीच झाले आहे.काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.तर पावसाचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज पुन्हा आदेश काढून उद्या शुक्रवार दि.२१ जुलै रोजी सिंधुदुर्गातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.