Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय मार्गदर्शन शाळेचे...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय मार्गदर्शन शाळेचे आयोजन… “

180

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय ओरस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळा रविवार १० मार्च रोजी ओरस वाचनालय येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता प्रतिनिधी नोंदणी, अल्पोहार व सकाळी 10:30 वाजता उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती मधु मिता निकम यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष स्थानिक सधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के स्वागत अध्यक्ष ओरस वाचनालय अध्यक्ष प्रकाश जैतापकर, प्रमुख पाहुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा लेखा परीक्षक आधी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघ व ओरस वाचनालय यांनी केले आहे.