सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना केतनकुमार गावडे यांनी भेटून निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक – युवती व इतर जनतेला भेडसावणाऱ्या समस्या आणि सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.
निवेदनात दिलेल्या समस्या खालीलप्रमाणे.
१) युवक-युवती यांना प्रामुख्याने रोजगाराची समस्या भेडसावत आहे. इथल्या युवकांना नोकरीसाठी गोवा, मुबंई, पुणे तसेच इतर ठिकाणी जावं लागत. सिंधुदुर्ग जिल्ह्या मोठ्या कंपन्या नाही आहेत. एमआयडीसी मध्ये तेवढ्या चांगल्या नोकऱ्या नाही आहेत.
२) जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत जंगली वन्यप्राणी विशेषतः गवा रेडा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पण योग्य मिळत नाही आहे. दोडामार्ग मध्ये विशेषतः हत्ती या वन्यप्राण्याने हैदोस घातला आहे.
३) आरोग्य व्यवस्था पण खिळखिळी झाली आहे. एखादा मोठा आजार असेल तर कोल्हापूर, गोवा व मुंबई शिवाय पर्याय नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत.
४) महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. बचत गटांना काम मिळालं तर महिला सक्षम होतील.
५) सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आतापर्यंत कुठच्याही प्रकारचा विकास पर्यटन वाढीसाठी झाला नाही आहे. पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांना तसेच इथल्या सामान्य जनतेच्या दोन हातांना रोजगार उपलब्ध होईल.
६) डी.एड बेरोजगारांची संख्या खूप आहे. निवृत्त झालेल्या शिक्षकांना सेवेत समाविष्ट करण्याऐवजी बेरोजगारांना नोकरी मध्ये समाविष्ट केले तर खूप चांगले होणार. जेणेकरून तेवढी बेरोजगारी कमी होऊन अनेक कुटुंब सुखी होतील
७) मुख्य रस्ते तसेच गावातील प्रमुख रस्ते अजूनही नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. ज्याठिकाणी रस्ते झाले आहेत त्याठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री महोदय हे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहेत. जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल, उद्योग कंपन्या तसेच विविध समस्यांची कमतरता आहे.
तरी आपण ह्या सर्व समस्या शासन दरबारी मांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा व योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी शासनास वेठीस धरावे.