मनसे विद्यार्थीसेना राज्य मुख्य संघटक यश सरदेसाई आणि मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान सावंतवाडीत जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा भव्य पक्षप्रवेश.
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्गात झालेल्या दौऱ्या दरम्यान मनसे विद्यार्थी सेना राज्य मुख्य संघटक यश सरदेसाई, मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे आणि मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांच्या दौऱ्यामुळे सर्व पक्ष सहकारी व पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यात सावंतवाडी मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले सिंधुदुर्गातील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी पक्षनिरीक्षकांसमोर केला. भडीमार शिक्षणाला चांगले दिवस कधी येतील? राज्यात कोकण एक नंबर वर असतो, तरी पण इथे शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. त्यात मुलांना येण्या जाण्यासाठी बस सेवा आणि आरोग्य सेवेची वाट लागलेली आहे. मुलांनी अशी खंत व्यक्त केली. या प्रश्नांना संबोधित करत असताना कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे व विद्यार्थी सेना राज्य मुख्य संघटन यश सरदेसाई यांनी मुलांच्या प्रश्नांची आता आमच्याकडून तुमचे प्रश्न सुटत आहेतच पण जेव्हा तुम्ही ही मनसेच्या एक हाती सत्ता देणार तेव्हा शिक्षण, आरोग्य आणि बस सेवा आम्ही सुरळीत करून देऊ. त्यात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या भुलभुलया करणाऱ्या कंपन्या कमी पैशात जास्तीत जास्त पैसे कसे तुम्हाला देऊ? असे आमीष दाखवून भुलवणाऱ्या कंपन्यांना पण मनसे दणका देईल. आम्ही सिंधुदुर्ग वासियांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. तुम्ही आमच्या बरोबर असेच खंबीरपणे उभे राहा. असं म्हणाले.
विद्यार्थीचा मनसे पक्षात प्रवेश करून घेतला. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव गुरूदास गवंडे, तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, विभाग अध्यक्ष- न्हावेली अक्षय पार्सेकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, उपतालुकाअध्यक्ष सुनिल आसवेकर, विभाग अध्यक्ष -बांदा विष्णू वसकर, विभाग अध्यक्ष -आंबोली काशीराम गावडे, शहर अध्यक्ष- बांदा चिन्मय नाडकर्णी, नेमळा सुयोग राऊळ, सावंतवाडी तालुका विध्यार्थी सेना संपर्क अध्यक्ष सचिन पाटणकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, साहिल तळकटकर, प्रतीक मालवणकर, अमोल नाईक, दिपाली राऊळ, रसिका पालव, संध्या पाताडे, मानसी परब, शमिका सावंत, निकेश पेडणेकर, मिथुन राठोड, गोविंद माईनकर, चित्रा तांडेल, सोनाली शेळके, सुनीता सावंत, ऐश्वर्या चव्हाण, वैभवी नावेलकर, दीक्षा कोळेकर, हर्षदा काशकर, वैदही मांजरेकर, वैष्णवी नावेलकर, सुनिधी मराठे, नितेश दळवी, वंश नाईक, शुभम बांदेकर, आदी उपस्थित होते.