Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन बोगस..! योगेश धुरी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन बोगस..! योगेश धुरी 

170

माणगाव मध्ये एक व्यक्ती वाहून गेल्यानंतर पण आपत्ती व्यवस्थापनाचा पत्ता नाही..! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

 

कुडाळ: कालपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. या पार्श्वभूमीवर जिल्हात पुरस्थितीवर आपत्ती व्यवस्थापनाचा लक्ष असावा लागतो. मात्र जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन बोगस आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी स्पष्ट केलं आहे.

 

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी पुढे म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली लाखो कोटी रुपयांची तरतुद होत असते मात्र त्याचा नक्की कोणाला फायदा हा संशोधनाचा भाग आहे. ज्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल ते एसी मध्ये बसून आहेत ते फक्त निवडणूकाना पैसे वाटण्यासाठीच जिल्ह्यात येत असतात बाकी त्यांचा जिल्ह्याला काहीच फायदा नाही. माणगाव आंबेरी पुलावरुन एक व्यक्ती वाहून गेल्यावर आता ५ तास होऊन देखील NDRF पथक पोचलं नाही. मग अश्या टीम चा काय फायदा? असा प्रश्न युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला आहे.

 

तसेच पाच तास उलटूनही प्रशासन जाग होत नसेल, पथक पोचत नसेल तर जिल्हाधिकारी जिल्ह्यात आहेत की नाही? असा प्रश्न पडतो, की मान्सून एन्जॉय करता आहेत. पावसाच्या आधी कॉल करून सगळयांना बोलवून घ्यायचं आणि रंगीत तालीम घ्यायची की आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम संपला. त्या वाहून गेललेल्या व्यक्तीला काय झालं? तर त्याला आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जबाबदार राहतील. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी सांगितलं आहे.